शासकिय आश्रम शाळा देवई येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा,अल्काताई आत्राम यांचा पुढाकार

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम

पोंभूर्णा तालुक्यातील देवई येथील शासकिय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत भाजपाच्या प्रदेश महामंत्री कु. अल्काताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला आणि भेट म्हणून विद्यार्थांना नोटबुकचे वितरण करन्यात आले आश्रम शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे बाहेरून आलेले असतात. शिक्षण घेत असतांना प्रत्येक विद्यार्थ्याला घरी जाने शक्य होत नाही अशा वेळी ती खंत विद्यार्थ्यांन मध्ये राहू नये या निस्वार्थ हेतूने भाजपा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम यांनी शाळेत जाऊन मुलांना राखी बांधली त्यांना भेटवस्तु हि दिल्या यावेळेस विद्यार्थ्यांच्या चेहरयावर स्मित हास्य फुलून आले त्यांनी आनंद व्यक्त केला अल्काताईच्या रुपानी जनु त्यांना त्यांची बहिनच भेटली असा हा आनंदमय सोहळा उत्साहात पार पड़ला यावेळी कु.अल्काताई आत्राम भाजपा प्रदेश महामंत्री, धोंगडे सर मुख्याध्यापक, गृहपाल मॅडम, वाघाडे सर, वैशाली बोलमवार, वैभव पिंपळशेडे, सुरज बुरांडे आणि सर्व कर्मचारी विद्यार्थी उपस्थिती होते.