
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील रुग्ण मित्र संजय गणपत गुरनुले यांचा नागपुर येथे सत्कार करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे ५ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर हा कार्यक्रम क्षत्रिय कोसले माळी समाज (विदर्भ) नागपूर संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला होता सदर या कार्यक्रमांमध्ये नागपूर सह परिसरातील जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी व समाजकार्य करणाऱ्या नागरिकांचा सत्कार या कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. तर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील रुग्ण मित्र संजय गणपत गुरनुले यांनी अहोरात्र मेहनत घेऊन राळेगाव तालुका सह आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांची निशुल्क सेवा केल्याबद्दल त्यांचा अविनाश ठाकरे (माजी उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा) ओबीसी महामंडळ यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला आहे. सदर या सत्कार समारंभाला उपस्थित संध्याताई गुरनुले माझी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर, नामदेवराव कोकोडे संचालक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मधुसूदन देशमुख सचिव क्रांतीज्योती माळी विकास संस्था नागपूर तसेच क्षेत्रीय कोसले माळी समाज विदर्भ नागपूर येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते
