
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अति पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठे नुसकान झाले आहे, शेतमालाचे नुसकान झाल्या मुळे शेतकऱ्याच्या
मेहनतीवर पाणी फेरल्याने आर्थिक संकट मध्ये सापडला आहे.
राळेगाव तालुक्यात सतत पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. महिनाभर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सावंगी पेरखा, झाडगाव, आपटी (रामपूर) वाढोणा (बाजार), वडकी शिवारात सोयाबीन, कपाशी, तूर यासह अनेक पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. शेत जमिनींवर साचलेल्या पाण्यामुळे नवे पेरणीचे काम थांबले असून उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, पुढे काय करावे याचा प्रश्न त्यांना सतावत आहे. पावसाचा हा जोर अजून किती दिवस कायम राहील, याची भीती साऱ्यांच्या मनात दाटून आलेली आहे.
तालुक्यात मागील दहा दिवसांत तिसऱ्यांदा कोसळलेल्या मुसळधार आणि संततधार पावसाने शेतीला मोठा फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
संततधार पावसामुळे पाण्याखाली गेलेली शेती.
मदत व अनुदान तातडीने मिळावे अशी अपेक्षा व्यक्त
होत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची तीव्रता कायम राहण्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांवर आणखी संकटे ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मदतीचा हात पुढे करावा, यावेळ होत आहे. यावेळी अशी तालुक्यातून मागणी
सोयाबीनचे पीक हातातून गेले आहे, तर कपाशीच्या फुलांची झड होऊन बोंडे सडू लागली आहेत. यामुळे हजारो शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले होते, परंतु, सततच्या पावसामुळे त्यांचे कष्ट व्यर्थ ठरले आहेत. शेतीत जाणेही
अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी पाय गुडघाभर चिखल असल्याने शेतीकाम ठप्प झाली आहेत.
त्यामुळे यंदाच्या हंगामात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढून पिके लावावी लागली होती, परंतु
ओला दुष्काळ जाहीर करावा
सततच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीनवर मोझेंक रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आधीच नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊन ते टोकाचे पाऊल उचलू शकतात..
