सावळेश्वर येथील वीर मरण प्राप्त झालेल्या चेतन च्या आई ला मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात

माहागाव प्रतिनिधी, :- संजय जाधव

                               

सावळेश्वर येथे दिनांक २६ जून रोजी पैनगंगा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलीला वाचवण्यासाठी चेतन ने धाडस करून त्यांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता पैनगंगेत उडी टाकली . त्यामळे चेतन , कावेरी,व अवंतिका हे तिघे मृत्युमुखी पडले. तो दिवस म्हणजे सर्व सावळेश्वर च नव्हेतर उमरखेड तालुका या गोष्टी मुळे हादरून निघाला . सर्वत्र या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. तो दिवस म्हणजे सावळेश्वर वाशी यासाठी काळा दिवस ठरला. चेतन ला वडील नाहीत बाल पणातच वडिलाचे छत्र हरवले. चेतन ला तीन बहिणी असून एका बहिणीचा विवाह झालेला असून एक इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे तर एक बहीण अंदाजे दहा ते बारा वर्षाची ती दोन्ही पायाने अपंग आहे. त्यामुळे चेतनचे शिक्षणाची व सर्व कौटुंबिक जबाबदारी आईवर येऊन ठेपली होती. रोजमजुरी करून आई उदरनिर्वाह करत असे. त्यात चेतन ला वीर मरण प्राप्त झाले त्यामुळे चेतनच्या आईवर अधिकच दुःखाचा डोंगर कोसळला . गेलेला चेतन परत काय मिळणार नाही. परंतु थोडी का होईना मदतीची साथ म्हणून सावळेश्वर येथील नागरिकांनी त्याच्या आईला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडी आर्थिक मदत करण्याचे आव्हान सावळेश्वर येथील पोलीस पाटील अनिल कांबळे,विवेक पाटील रावते,विलास रावते यांनी केले. सोशल मीडियावर तशी चेतनच्या आईसाठी मदत करण्याची पोस्ट टाकली गेली. त्यावेळी लागलीच दायित्व जपत अनेक नागरिकांनी मदतीसाठी हात पुढे केले. जमेल त्या पद्धतीने सावळेश्वर गावातील पोलीस पाटील अनिल कांबळे, विवेक पाटील रावते,विलास रावते यांच्या फोन पे नंबर वर फोन पे करून दायित्व जपले. यामुळे गेलेला चेतन काय परत येणार नाही परंतु त्याच्या आईसाठी एक मदतीचा हात म्हणून उमरखेड तालुक्यातून अनेकांनी मदत केली. तालुक्यातून जरी आम नागरिकांनी मदत केली तरी कोणत्याही राजकीय नेत्यांनी सढळ हाताने मदत केलेली नाही. व शासनाकडून कोणत्याही प्रकारची अद्याप मदत मिळालेली नाही . त्यामुळे उमरखेड तालुक्यातील कोणत्यातरी लोकप्रतिनिधीने पुढे येऊन चेतनच्या आईसाठी आर्थिक मदत करावी किंवा शासनाकडून निधी मंजूर करण्यात यावा असे नागरिकांच्या वतीने बोलले जात आहे. उमरखेड तालुक्यातील मोठमोठे लोकप्रतिनिधी नावालाच का? सत्ता असून सत्तेत बसून सुद्धा सावळेश्वर येथे पैनगंगा नदी पात्रात बुडून वारलेल्या कुटुंबाला सात्वन पर भेट नाही.किंवा शासन स्तरावर कोणतीही मदत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांच्या तोंडून एकच ऐकायला मिळत आहे . ते म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे असे लोकप्रतिनिधी आपल्या काय कामाचे जे अशा वेळी नागरिकांच्या मदतीसाठी धावून येणार नाहीत. लोकप्रतिनिधी नुसतीच बॅनरबाजी करण्याच्या कामी का? सर्वत्र उमरखेड तालुका व जिल्ह्यात सुद्धा सावळेश्वर येथील घटनेमुळे आम नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत असताना. तालुक्यातील लोकप्रतिनिधीनी याकडे गांभीर्य दाखवून काहीतरी मदत करणे अपेक्षित होती. असे सावळेश्वर येथील नागरिकातून बोलले जात आहे.