पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाला भाविकांचा मोठा प्रतिसाद, भाविकांनी केले गणेशाचे मनोभावी विसर्जन आधार फाउंडेशन व नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम

हिंगणघाट शहरातील वणा नदीच्या पात्रामध्ये दरवर्षी मोठया प्रमाणात घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मुर्तिचे विसर्जन होते मागील काही वर्षापासून फाउंडेशन व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्माने कृत्रिम गणेश जलकुंड निर्मिती करून निर्माल्य संकलनाचे अभियान राबविले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांनी उपक्रमाला मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला गणेशकुंड ची निर्मिती न्यू मुन्सिपल हायस्कूल येथे करण्यात आले जवळपास 585 गणेश मूर्तीचे कुंडामध्ये विसर्जन झाले चार ट्रॅक्टर निर्मल गोळा झाले आहे. दिनांक 16 ते 18 या दरम्यान सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत अविरत आधार फाउंडेशन च्या सदस्यांनी व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी तसेच पीओपीच्या मूर्ती वर असलेल्या बंदीमुळे गणेश विसर्जन जलकुंडाची निर्मिती करण्यात आली दहा बाय पंधरा खोली असलेला कृत्रिम तलाव केला आहे यावर्षी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे भाविकांनी मनोभावे जलकुंडामध्ये गणेशमूतिचे विसर्जन केले आधार फाउंडेशनने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत या तलावामध्ये विसर्जन केलेले आहे गणेश मूर्तीचे विसर्जन निर्माल्याचे विसर्जन केले नदीचे पाणी दूषित होऊ नये म्हणून नदी स्वच्छतेची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहेस याच हेतूने आधार फाउंडेशन च्या वतीने पर्यावरण बचावासाठी गणेश विसर्जन कुंडाची करण्यात आली आहे या उपक्रमाला आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जगदीश वांदिले, उपाध्यक्ष राजेशजी कासवा ,सुनिल डांगरे,परागजी मुडे प्रा. डॉ. शरद विहीकर,डॉ.गिरीधर काचोळे, लक्ष्मीकांत धार्मिक ,दुर्गाप्रसाद यादव,सुहास घिनमिने, सचिन येवले प्रा. डॉ. विठ्ठल घिनमिने, सचिन येवले, मधुकर चाफले, सुरेश गुंडे ,माधुरी विहीरकर , मायाताई चाफले, वीरश्री मुडे,ज्योती धार्मिक,सुमन डांगरे,अनिता गुंडे,रश्मी धायवटकर तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,प्रशासकीय अधिकारी संतोष जगवार,विशाल ब्राम्हणकर,अमर रेवते, गंडाईत सातपुते ,पिंपळखूटे,विशाल धबकडे, गंगाधर पडाल वसंता ढोले आदीने सहकार्य केले