
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र चिंतामणी येथे मंगळवारी अंगारिका चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. गणरायाच्या जयघोषात आणि गजरात भक्तांनी रांगा लावून दर्शन घेतले. सकाळपासून सुरू झालेल्या धार्मिक विधी, अभिषेक, महाआरती व भजन-कीर्तन कार्यक्रमांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले. दूरदूरवरून आलेल्या भाविकांनी श्रद्धेने व नवसाने श्री गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात आणि गावात दिवसभर उत्सवी माहोल पाहायला मिळाला. उत्सवासाठी स्थानिक ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. पोलिस व प्रशासनाकडून वाहतूक व सुरक्षेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
