राळेगाव येथे नागपूर वर्धा बसचा अपघात ,25 प्रवासी किरकोळ जखमी

सहसंपादक : रामभाऊ भोयर भोयर

नागपूर वरून राळेगाव कडे येत असलेली बस समोरील ट्रक ची धडक लागल्याने बसला सौम्य अपघात झाला यात पंचवीस प्रवासी किरकोळ जखमी झाले प्राप्त माहितीनुसार राळेगाव आगाराची बस क्रमांक एम एच 40 एन 89 28 नागपूर वरून राळेगाव कडे निघाली राळेगाव येथे पोहोचण्याकरता दोन किलोमीटर अंतरावर कापशी बायपास वर समोर जात असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसचा चालकाकडील भाग ट्रकला लागला त्यामुळे बस चालक सदानंद टेकाम यांच्या डोक्याला व हाताला मार लागला तसेच संगीता शिवरकर संतोष नांने आनंदा तागडे अथर्व पालेकर सुभाष भोंगे आणि कंडक्टर अमित राऊत हे किरकोळ जखमी झाले बसमध्ये 25 प्रवासी प्रवास करीत होते हे विशेष सर्व प्रवासी सुखरूप असून ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे त्यांच्यावर उपचार करून सर्व प्रवाशांना डिस्चार्ज देण्यात आला दरम्यान पोलीस उपनिरीक्षक रवी राने यांनी घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांना ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे उपचार करता दाखल केले……….. आगाराचे व्यवस्थापक बोकडे यांनी पोलीस स्टेशन येथे रिसर्च तक्रार दाखल केली आहे