वृक्षारोपण करून शाळेचा पहिला दिवस साजरा
श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयात स्तुत्य उपक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे आज शाळेचा पहिला दिवस वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला.आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्री राजुजी काकडे,गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिति राळेगाव,कु मेघना गुंडकवार,रेंज फॉरेस्ट ऑफिसर सामाजिक वनीकरण विभाग राळेगाव,धीरज जी चव्हाण, फारेस्टर वनीकरण विभाग राळेगाव, राजेश शर्मा मुख्याध्यापक गामवि अंतरगाव , जेष्ठ शिक्षक एम.पी.सामृतवार व शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता, रंगीबेरंगी कपड्यात मुले छान दिसत होती. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, पाहुण्यांनी पर्यावरण स्वास्थ्य कसे चांगले राहिल यावर उद्बोधन पर विचार व्यक्त केले, त्यानंतर पाहुणे, शिक्षक व विद्यार्थी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.50 वृक्षांची रोपे शालेय परिसरात लावण्यात आली.कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना केडबरी चाकलेट,सोनपापडी व पेन्सिल देउन कार्यक्रम पर्यावरण पूरक घोषणा देऊन संपन्न झाला.कार्यक्रमांचे उत्कृष्ट संचालन व आभारप्रदर्शन अजयकुमार नरडवार सहाय्यक शिक्षक यांनी केले.