पावसामुळे शेकडो एकर जमिनीवरील पीक पाण्याखाली,भर पावसात तहसीलदार यांनी केली शेताची पाहणी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शुक्रवारी तालुक्यात सकाळ पासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आणि नाल्या काटच्या शेतात पाणीच पाणी दिसु लागले आहेत सद्या पीक लहान आहे त्यामुळे शेतातातील सर्व पीक पाण्याखाली गेले राळेगाव तालुक्यातील वारहा व आष्टा रोडवरील नाल्याला पूर आला त्यामुळे नाल्याच्या काठावर असलेल्या शकडो एकर जमीनीवर असलेले पीक दिसेनासे झाले आहे कारण संपुर्ण शेतात फक्त पाणीच पाणी दिसु लागले आहे. अनेकदा हा नाला सरळीकरण व खोलीकरण करून देण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली परंतु अजूनही खोलीकरण करून देण्यात आले नाही त्यामुळे दरवर्षी शकडो एकर जमीनिवरील पीक पाण्याखाली राहते. शेतकरी दरवर्षी प्रशासनाकडे नाला खोलीकरण करून देण्याची मागणी करतात परंतु प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे त्वरीत नाला सरळीकरण व खोलीकरण करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. दोन दिवसात पाऊस कमी झाला की प्रशासनाने नाला खोलीकरण करून दिले तर आमच्या घरी काही तरी शेतातील पीक जाईल खोलीकरण झाले नाही तर आमच्या हाती काहीच लागणार नाही असेही शेतकरी बंडू लोहकरे यांनी सांगितले.


भरपावसात तहसीलदार अमित भोईटे यांनी केली शेताची पाहणी

तालुक्यातील आष्टा रोडवरील नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने अनेक एकर जमिनीवरील पीक पाण्याखाली गेल्याची माहिती तलाठी यांनी प्रशासनाला दिली व भरपावसात तहसीलदार अमित भोईटे हे आष्टा व वारा रोडवरील शेताची पाहणी करण्यासाठी भरपावसात गेले व त्यांनी शेतातील पिकांचे किती नुकसान झाले याची पाहणी केली व ज्या ठिकाणी पावसामुळे पुलावरून पाणी जात आहे त्या ठिकाणी कोणीही पाण्यामध्ये वाहन टाकून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले.