
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे दिनांक 3 जुलै रोजी राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून एक पेड मॉं के नाम उपक्रम राबविण्यात आला .शाळेतील इको क्लब च्या माध्यमातून “एक पेड मॉ के नाम” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटावे यासाठी शाळेमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी व आई यांच्या माध्यमातून शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे , पर्यवेक्षक सूचित बेहेरे, हरित सेना प्रमुख, गोपाल बुरले तसेच शाळेतील विद्यार्थिनी कु. अक्षरा विशाल आत्राम व आई सौ अश्विनी विशाल आत्राम यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक राजेश काळे, विनोद चिरडे, नितीन जुनूनकर तसेच शिपाई सुरज पवार व हरित सेनेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका यावेळी उपस्थित होते.
