मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे स्वातंत्र्यदिन साजरा

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष मान, रमेशजी सुंकुरवार, संस्था सचिव मान, राहुल सुंकुरवार, संचालक प्राची सुंकुरवार पालक वृंद शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक मान,आमिननुरानी, उपस्थित होते, प्रसंगी फोटोला हार अर्पण दिप प्रज्वलन करुन मान, रमेशजी सुंकुरवार अध्यक्ष यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.मुलांनी राष्ट्रगीत म्हंटले , प्रसंगी आनंदमय वातावरण होते. मुलांनी प्रमुख पाहुणे यांना पथसंचलन करुन मानवंदना देण्यात आली स्वातंत्र्य दिनाचा उत्साह त्याच बरोबर मुलांना देशप्रेम, समता बंधुभाव एकात्मता निर्माण करण्याच्या हेतूने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रसंगी स्वागत गीत, देशभक्ती गीत सादर करण्यात आले, संस्था सचिव राहुल सुंकुरवार यांनी मुलांना थोर महापुरुष, तसेच स्वातंत्र्य करीता त्यांचे योगदान यावर सखोल माहिती दिली. मुख्याध्यापक मान आमिन नुरानी यांनी मुलांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले, त्यानंतर मुलांनी आपल्यातील सुप्त कला गुणाचे सादरीकरण केले यात भाषण,देशभक्ती गीत गायन, नृत्य सादर करण्यात आले. यात विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला, कार्यक्रमाचे संचालन उल्काताई काकडे तर आभार अनुश्री देशपांडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वितेकरीता शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परिश्रम घेतले, समारोप प्रसंगी मुलांना खाऊ देण्यात आला.