वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव येथे संविधान दिन साजरा

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच संविधानातील मुलभूत कर्तव्यांचे पालन करावे – ठाणेदार प्रताप भोस

प्रतीनीधी,प्रवीण जोशी
ढाणकी..


वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव बु येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.यावेळी बिटरगांव बु पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधान बनवण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे पूर्णपणे तयार झाले.
26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारतासाठी अतिशय खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतामध्ये संविधान औपचारिकपणे स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करणे हा आहे. भारताचे संविधान बनवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो.तसेच विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच संविधानातील मुलभूत कर्तव्यांचे पालन करावे. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाच्या प्राचार्या कुसुम मुनेश्वर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप भोस ठाणेदार बिटरगाव बु,माजी सैनिक भिमराव पाईकराव,श्रावण गायकवाड सामाजिक कार्यकर्ते, मुख्याध्यापक मुकुंद येल्हेकर अहिल्यादेवी होळकर प्राथमिक मराठी शाळा बिटरगांव बु पर्यवेक्षक जी.पी.भगत सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक एस.टी.बेद्रे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन वेळी क्रीडा शिक्षक संजय पावडे व विद्यार्थ्यांनी उमरखेड तालुक्यातुन कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक कु.मंगला गावंडे यांनी केले.तर सुत्रसंचलन एक.टी.माने, बि.बी.वाठोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन जे.वाय.बरगे यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक उपस्थित
होते.