तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत आष्टोना जि. प. शाळेने मारली बाजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपल्या अंगी असलेल्या कौशल्याने खेळ करीत जि.प.शाळा आष्टोना च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले.
खेळ व क्रीडा संवर्धन मंडळ. पंचायत समिती राळेगाव अंतर्गत लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा सामन्यात जिल्हा परिषद शाळा आष्टोना येथील विद्यार्थिनी कबड्डी. खो खो. १०० मि रनिंग ४/१०० रिले, लांब उडी, टेनीक्वाईड, गोलाफेक, थाळीफेक, चेस कॅरम, बॅडमिनटन इत्यादी खेळात कौशल दाखवत १४ प्रकारात शाळेला प्रथम क्रमांकाचे विजेतेपद तर ७ प्रकारात अविजेतेपद पटकिविले. खेळामध्ये उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनामुळे जि.प आष्टोना शाळेने तालुक्यातील चॅम्पियंशीप पटकावली. या क्रीडा प्रकारात सौरभ ठमके, प्रेम जाधव, साक्षी हुलके, प्रीती टोंगे, साक्षी मेश्राम, श्रेया डाहुले, नेहा येरगुडे, आरती पिंपळशेंडे, स्नेहा पारखी, सुहानी नेहारे, सानिया गाडवे, सानिया बोबडे, सान्वी येरगुडे, दिव्या कन्नाके, नम्रता गाडवे, तेजु गाडवे, विजेता गेडाम, वैष्णवी मेश्राम, सायली देवतळे, परी देवतळे, आराध्या काकडे, आशिष राऊत, ई. विद्यार्थिनी यश संवादन केले. चमू शिक्षक नितीन पाटील. मुख्याध्यापक ढोले सर, सौ.चिमोटे मॅडम, सौ. गुडधे मॅडम व सर्व विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष अनिल मेश्राम व इतर सदस्यांनी तसेच ग्रा.प आष्टोना सरपंच सौ. अर्चनाताई गोवरदीपे व उपसरपंच शंकर वरघट आणि गावकऱ्यांनी सर्वांचे कौतुक केले.