यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फुलसावंगी येथील शाखा व्यवस्थापक श्री.धनंजय विलासराव मस्के यांची कर्तव्य निष्ठा ,सहकार्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )


महागांव तालुका अंतर्गत येणारी फुलसावंगी परिसरतील.यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक -शाखा -फुलसावंगी.येथील शाखा -प्रबोधक श्री. धनंजय विलासराव मस्के साहेब. यानी शेतकऱ्यांना बँक मध्ये वेळोवेळी संपूर्ण माहिती देतात आणि त्याचे काम पण एका दिवसामध्ये परिपूर्ण करून घेतात.कारण परत शेतकऱ्याला मानसिक त्रास होऊ नये, खर्चाची बाजु होऊ नये म्हणून हे समजुन घेता एका दिवसातच बँकेचे काम करू देतात. एका शेतकरी बांधवाना एकाच दिवशी त्याचे खाते काढून देत करून त्याना दहा मिनिटात खाते पुस्तक पण दिले अश्या अनेक अडचणी न येऊ देत शेतकरी बांधवाचे कामे त्वरित करून देतात. धनंजय विलासराव मस्के साहेबानी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा -फुलसावंगी येथे कर्तव्य पार पाडत आहे असे ऐकण्यासाठी मिळत आहे .श्री धनंजय विलासराव मस्के शाखा व्यवस्थापक साहेबांनी एका वरिष्ठ अधिकारी साहेबांना बोलत असताना ते असे बोलत होते कि साहेब कर्ज मागणीचे फाईल नारळी येथील तेरा व निंगनूर येथील सात असे एकूण वीस शेतकऱ्याचे फाईल पाठविले आहे. त्या मंजूर होऊन केव्हा येईल साहेब कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक कमतरता असते .लोन फाईल मंजुर करून पाठवा सर शेतकऱ्यांना वाटप करून देऊ असे म्हटले आहे. शाखा व्यवस्थापक मस्के सर हे शेतकऱ्याचे शुभ चिंतक आहे.असे शेतकऱ्याकडून ऐकण्यास मिळत आहे.