किन्ही जवादे फाट्याजवळ रस्ता दुभाजक नसल्याने वाहन चालकांची गैरसोय,माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरकेंनी एन एच आयच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

माजी शिक्षण मंत्री वसंत पूरके यांनी दिनांक 16 जुलै रोजी तालुक्यातील किन्ही जवादे या गावाला भेट दिली या भेटीदरम्यान गावातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या, किन्ही जवादे हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर स्थित असून, गावाला बरीचशी गावी जोडलेली आहे.गावाची लोकसंख्या ही जवळपास १५०० च्या आसपास असून गावात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एकुर्लि धुमक चाचोरा, विहीरगाव,खैरगाव इत्यादी गावांना जाताना किन्ही जवादे या गावावरून जावे लागते. किन्ही जवादे येथे येण्यासाठी दक्षिणेकडून २ किलोमीटर तर उत्तरेकडून एक ते २ किलोमीटर एवढे अंतरावर दुभाजक असल्यामुळे एवढ्या १ ते २ किलोमीटर अंतरावरुन विरुद्ध दिशेने वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागते. ही बाब धोक्याची असून
विरुद्ध दिशेने जातांना सुसाट धावणारी वाहने अंगावर येत असून त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात घडले आहे.एन एच आयच्या अशा चुकीच्या धोरणामुळे आतापर्यंत अपघातात अनेकांचे जीव सुद्धा गेले आहे.नॅशनल हायवे क्रमांक 44 वरील किन्ही जवादे फाट्यावरील हायवे रोडवर संबंधित कंत्राटदारांनी रस्ता दुभाजक दिला नसल्याने त्याकाठी जायचं असल्यास वाहनचालकांना एक ते दीड किलोमीटर अंतर पार करून जावं लागतं.शेतकऱ्यांना शेतात बेल बंडी घेऊन जाणे येणे करिता मोठी कसरत करावी लागते.या गंभीर बाबीचे कथण ग्रामस्थांनी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांना केले, त्यांनी तात्काळ समस्येचे निराकरण करीत संबंधित एनएचआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमध्वनीवरून चांगलेच धारेवर धरले, व ही समस्या त्वरित निकाली काढण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. यावेळी त्यांचेसोबत वडकी येथील माजी सरपंच डॉ नरेंद्र इंगोले,वैकुंठ मांडेकर ,किशोर गमे, दातरकर , गोपाळ वाढई,सुनील भेंडारे , मंगेश मांदाडे, दीपक बोंडे ,राजू मोहुले,शंकर मांदाडे यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.