


सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धुमक येथील अंगणवाडी चे छप्पर उडून रवींद्र तोडासे यांच्या घरावर पडल्याने येथील रवींद्र तोडासे यांची पत्नी सौ प्रतीक्षा तोडासे व मुलगा दिशांत तोडासे हे गंभीर जखमी झाले असून यांना उमरी येथील ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे ३० मार्च रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान धुमक चाचोरा परिसरातील अकाली वादळी वाऱ्यास पावसाचे आगमन झाले असल्याने धुमक येथील अंगणवाडी चे छप्पर उडून रवींद्र तोडासे यांच्या घरावर पडल्याने तोडासे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रवींद्र तोडासे तयांची पत्नी प्रतीक्षा रवींद्र तोडासे व मुलगा दिशांत रवींद्र तोडासे हे गंभीर जखमी झाले असल्याने यांना तातडीने उमरी येथील ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे सदर तोडासे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन घरातील संपूर्ण जीवन आवश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील सरपंच सौ शालू शंकर तोडासे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मांदडे, सचिव पंढरी खडसे, महसूल विभागाचे कर्मचारी एम. डी. सानप मंडळ अधिकारी, सौरभ चांदेकर, तलाठी, रवी ठाकरे कोतवाल यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढे अहवाल सादर केला आहे. सदर तोडासे परिवारांना राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना तात्पुरते दुसरीकडे स्थलांतर केले असल्याचे सांगितले आहे
