श्री लखाजी महाराज विद्यालयाकडून वडते सरांना दिला सेवानिवृत्तीचा निरोप

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे श्री लखाजी महाराज विद्यालयात श्रावनसिंग वडते हे सहायक शिक्षक म्हणून 8/2/1999 रोजी मिडल स्कूल विभागात रुजू झाले होते.त्यांनी या विद्यालयात 25 वर्षे 3 महिने 6 दिवस नोकरी केल्यानंतर वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शासनाच्या नियमानुसार आज दिनांक 31/5/2024 रोज शुक्रवारला सेवेतून निवृत्त झाले असल्याने त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी श्रावनसिंग वडते सर व सौ.गिता श्रावनसिंग वडते यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास निमरड यांनी केले.सोबतच विद्यालयातील शिक्षक दिगंबर बातुलवार सर, रंजय चौधरी सर, सौ.कुंदा काळे मॅडम यांनी वडते सरांच्या कार्यावर प्रकाश टाकला व त्यांना व परिवाराला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे संस्थेचे माजी अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे व संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मंचावर संस्थेचे संचालक गुलाबराव महाजन,दिलीप देशपांडे हे उपस्थित होते. या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे, संचालक चित्तरंजन कोल्हे, गुलाबराव महाजन, दिलीप देशपांडे, मुख्याध्यापक विलास निमरड, जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर,दिगांबर बातुलवार, रंजय चौधरी, राजेश भोयर, मोहन आत्राम,मोहन बोरकर, विशाल मस्के,सौ.कुंदा काळे, वंदना वाढोणकर, वैशाली सातारकर,रूचिता रोहणकर, अश्विनी तिजारे, लिपिक वाल्मिक कोल्हे, पवन गिरी यांचे सह सौ गिता श्रावनसिंग वडते,कुमारी स्नेहा श्रावनसिंग वडते,कुमारी प्रियानी अनिल पवार,विनोद शेलवटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भोयर सर यांनी केले तर आभार सौ.वंदना वाढोणकर मॅडम यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याची माहिती प्राध्यापक रंजय चौधरी यांनी दिली.