
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकसभेतील यशानंतर प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून १० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वसाधारण वर्गासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकाला अर्जासोबत २० हजार रुपये पक्षनिधी म्हणून प्रदेश काँग्रेसकडे जमा करायचे आहेत. अनु, जाती, अनु, जमाती व महिला उमेदवारांना पन्नास टक्के सवलत असून त्यांना १० हजार रुपये भरायचे आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी मिळाली नाही तरी ही रक्कम परत मिळणार नाही. इच्छुक उमेदवार शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्फत तसेच प्रदेश काँग्रेसकडेही थेट अर्ज सादर करून शकतात. अर्जासोबत भरावयाचा पक्षनिधी रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नावे डी.डी. द्वारे प्रदेश काँग्रेस कमिटी किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करायचा आहे. उमेदवारांसाठी प्रदेश काँग्रेसने एक अर्ज जारी केला आहे. या अर्जात इच्छुक उमेदवाराला नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, व्यवसाय, जात-प्रवर्ग आदी माहिती सादर करायची आहे. काँग्रेस पक्षाचे मुखपत्र ‘शिदोरी’चे वर्गणीदार आहात का, पक्षाचे केव्हापासून व कोणत्या पातळीवरील सदस्य आहात, पक्ष संघटनेत सध्या कोणत्या पदावर आहात का, आदी माहितीसह कुटुंबातील कोणी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला का, याचे विवरणही सादर करायचे आहे.
बंडखोरी करणार नाही याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल
• प्रदेश काँग्रेसकडे अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना एक हमीपत्र द्यावे लागणार आहे. आपल्याला विधानसभेचे तिकीट मिळाले नाही तरी आपण काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविणार नाही. काँग्रेसच्या उमेदवारालाच पाठिंबा देईल, अशी लेखी हमी इच्छुक उमेदवारांना द्यायची आहे.
याशिवाय पक्षाच्या ध्येय धोरणाची पूर्णपणे सहमत राहील, पक्षाने काढलेल्या आदेशांचे व सूचनांचे पालन करील, उमेदवारी मिळाली नाही तरी अर्जासोबत भरलेला पक्षनिधी परत मागणार नाही व केंद्रीय निवड मंडळाने आदेश दिल्यास मी आपल्या जागेचा राजीनामा देईल, अशीही हमीद्यायची आहे.
• महत्वाचे म्हणजे आपल्या विरुद्ध कोणताही गुन्हेगारी खटला दाखल झालेला नाही, याचीही हमी द्यायची आहे.१२ जुलै रोजी मुंबईत बैठक विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी १२ जुलै रोजी मुंबई येथील टिळक भवनात प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
• महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली, सर्व कार्याध्यक्ष व प्रमुख नेते उपस्थित राहतील. या बैठकीत संघटनात्मक आढावा, जिल्ह्यातील रिक्त पदांबाबत प्रस्तावावरही चर्चा होईल.
🔸 प्रफुल्लभाऊ मानकर
राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर 2024 मध्ये होत आहेत. या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांचा अर्ज आणि ठरलेल्या रक्कम सहित दि.7 ऑगस्ट 2024 पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी यवतमाळचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांच्या कडे जमा करावे.
