जि. प. केंद्र स्तरीय सामन्यामध्ये येवती जि. प. उच्च प्राथमिक शाळा अव्वल स्थानी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नुकत्याच झालेल्या केंद्र स्तरीय क्रीडा सामन्यामध्ये धानोरा केंद्रातील एकूण 11 शाळांनी सहभाग घेतला होता. ही क्रीडा स्पर्धा जि. प. उच्च प्राथमिक शाळा चहांद येथे घेण्यात आली होती.स्पर्धेचे सुंदर नियोजन धानोरा केंद्रातील केंद्र प्रमुख मा. पारधी सर यांनी केले होते व व्यवस्थापन चिमणे सर यांनी केले. सरोदे सर यांनी ग्राउंडची आखणी करून क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यामध्ये विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. यात कबड्डी, खोखो, लंगडी, रनींग, बुद्धिबळ, कॅरम,लांब उडी, उंच उडी अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक वृदांनी आपापल्या शाळेतील मुलांना आणून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.यातील जास्तीत जास्त सामन्यामध्ये विजय मिळविण्याचा मान जि. प. उच्च प्राथमिक शाळा येवती यांनी मिळविला. यामध्ये येवती शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर सहाय्यक शिक्षक चालखुरे सर,माकोडे मॅडम, सरोदे सर यांनी परिश्रम घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर नेण्याचे काम त्यांनी केले