
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पंचायत समिती राळेगाव यांच्या वतीने सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये दिनांक १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान “पोषण माह” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण महिनाभर विविध उपक्रमांतर्गत आहार प्रात्यक्षिक, जनजागृती, आरोग्यविषयक मार्गदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात आले.
या उपक्रमाचा समारोप राळेगाव बिटमधील शिवरा येथील अंगणवाडी केंद्रात झाला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सिमाताई आडे (सरपंच) होत्या. प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून सागर विठाळकर (बाल विकास अधिकारी, राळेगाव), पर्यवेक्षिका स्नेहा अनपट व धरती कोराम उपस्थित होते. तसेच स्थानिक सेविका लता शेडमाके, सरला आडे, रेणुका गेडाम, अनिता धानोरकर, चंदा साखरकर, सुधा झोड, प्रतिभा कोवे, वंदना खैरकर, कल्पना लढी, साधना भोयर, रेखा कोवे, संगीता उईके, शीतल येचलवार, कल्पना सलाम, जया आडे, करुणा गेडाम, दिपाली शेडमाके, ज्योत्स्ना ठाकरे, लक्ष्मी गेडाम, पंचफुला धुमाळ, शिक्षिका ज्योती झाडे, श्रुती कुमरे, तसेच ग्रामस्थ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सागर विठाळकर यांनी उपस्थितांना आहार, स्वच्छता, पोषण आणि कुपोषण प्रतिबंध या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली. स्नेहा अनपट यांनी किशोरवयीन मुलींचे आरोग्य व परसबाग संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुधा झोड यांनी केले तर आभार प्रदर्शन धरती कोराम (पर्यवेक्षिका) यांनी मानले.
तालुक्यातील दहेगाव, वाढोणा, वरध, धानोरा आणि अंतरगाव या बिटमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. पर्यवेक्षिका पायल आत्राम यांनी वाढोणा व वरध येथे भेट देऊन मार्गदर्शन केले.
या उपक्रमाला महिला व किशोरवयीन मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, समाजात पोषणाबाबत जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम प्रभावी ठरला.
