
सहसंपादक: रामभाऊ भोयर
स्थानिक इंदिरा गांधी कला महाविद्यालय राळेगाव ला नॅकद्वारा नुकताच बी प्लस ग्रेड प्राप्त झाला. मागील महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील नॅक समितीने भेट देऊन सर्वांगीण तपासणी केली आणि महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण प्रगतीवर विशेष समाधान व्यक्त केले होते. या समितीचे अध्यक्ष, डॉ. सुरेश हेगडे, गणित व संगणकीय विभाग प्रमुख, एन. आय. टी. सुरतकल, कर्नाटक तसेच सदस्य समन्वयक, डॉ. अनुपमा उप्पल , अर्थशास्त्र विभाग प्रमुख, पंजाबी विद्यापीठ, पटियाला, पंजाब आणि सदस्य म्हणून डॉ अनियनकुंजू पी.सी. सेवानिवृत्त प्राचार्य, सेन्ट अलॉयसेस कॉलेज, इडाथुआ, केरळ हे होते. समितीने महाविद्यालयात दोन दिवस भेट दिली व त्यामध्ये समितीने अध्ययन -अध्यापन प्रक्रिया, संशोधन, खेळ व क्रीडा सुविधा तसेच इतर भौतिक सुविधा या व अशा सर्वच बाबतीत प्रत्यक्ष पाहणी आणि कागदपत्रांची तपासणी केली. तसेच महाविद्यालयाच्या दुसऱ्या सायकल साठी केलेल्या सादरीकरण, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालक व महाविद्यालयीन कर्मचारी यांच्याशी संवाद साधून मूल्यांकन केले. नॅक मूल्यांकन समितीसमोर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात गीत, नृत्य, लोकनृत्य अत्यंत उत्कृष्टपने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गेल्या दोन वर्षापासून स्व. चिंधुजी लक्ष्मणराव पुरके शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष मा. प्रा. वसंतरावजी पुरके, उपाध्यक्ष मा श्री व्ही. सी. आडे व सचिव मा. सौ. प्रेमलताताई पुरके आणि प्राचार्य डॉ. एस. व्ही. आगरकर यांच्या नेतृत्वात आय. क्यू. ए. सी. समन्वयक, प्रा. विवेक डी. समर्थ आणि नॅक समन्वयक, डॉ. विरेंद्रकुमार बरडे यांच्या मार्गदर्शनात, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम घेतले त्यामुळे महाविद्यालयाला बी प्लस (B+) दर्जा प्राप्त झाला. नॅक बेंगलुरू कडून विविध निकषांच्या आधारे संगणिकीकृत आणि वैयक्तिक तपासणीनंतर २.६३ सी. जी. पी. ए. सह बी प्लस मानांकन प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, प्रा. वसंतरावजी पुरके व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आगरकर यांनी सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.
