
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्रामीण भागातील विकासाचा दीपस्तंभ ठरलेले भिव मराव झिबल कोरवते, हे नाव आज पाटण बोरी सर्कलमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. आपल्या प्रामाणिक कार्यशैलीने आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे त्यांनी ग्रामपातळीवर विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता ते भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेच्या प्रचंड पसंतीस उतरले आहेत.सन 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठींबा नसताना केवळ जनतेच्या विश्वासाच्या बळावर त्यांनी निवडणूक लढवली. त्या वेळी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी किंवा इतर कोणत्याही राजकीय संघटनेचा पाठिंबा नसतानाही त्यांनी लोकशाहीच्या ताकदीवर विजय मिळवत गट ग्रामपंचायत बहात्तरचे सरपंच पद भूषविले. त्यांच्या या विजयाने “जनतेचा नेता कोण” याचं उत्तर लोकांनी स्पष्टपणे दिलं.
सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले. ग्रामपंचायतीतील पारदर्शक कामकाज, लोकशाही पद्धतीचा अवलंब, विकास योजनांमध्ये न्याय्य वाटप, आणि जनतेशी थेट संवाद या गुणांमुळे कोरवते यांनी गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय बदल झाले.आज त्यांच्या या कार्यामुळे पाटण बोरी सर्कल तसेच परिसरातील लोक त्यांच्याकडे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहत आहेत. ग्रामविकासातील अनुभव आणि जनतेशी असलेला आत्मीय संबंध यामुळे त्यांना सर्व समाजघटकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. युवक वर्ग, शेतकरी, महिला आणि वयोवृद्ध नागरिक त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुढे सरसावत आहेत.
भिमराव कोरवते म्हणतात —
“मी कोणत्याही पक्षाचा नाही, माझा पक्ष म्हणजे जनता आणि माझं ध्येय म्हणजे विकास. प्रत्येक नागरिकाला समान न्याय, समान संधी आणि विकासाची वाट मिळावी हेच माझं ध्येय आहे.”
त्यांच्या या विचारसरणीने आणि सकारात्मक कार्यपद्धतीने त्यांना सामान्य जनतेचा अपार पाठिंबा लाभत असून, पाटण बोरी सर्कलमधील लोक त्यांना भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहत आहेत.गावोगावी, सर्कलभर त्यांच्या जनसंपर्क मोहिमा सुरू असून, लोकांमध्ये “भिमराव कोरवते म्हणजेच प्रामाणिकपणा आणि विकासाचं प्रतीक” अशी भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्कलचा विकास नवा आयाम गाठेल, अशी अपेक्षा जनतेत व्यक्त होत आहे.
