
मोहदा :- तालुक्यातील मोहदा येथे असलेल्या बंद असलेल्या डोलोमाईड गिट्टी खदाणीत साचलेल्या पाण्यात आज ता. ५ रोजी सकाळी एका अनोळखी महिलेच प्रेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
मोहदा परिसरात असंख्य गिट्टी खदानी असून या ठिकाणी शेकडो कामगार परप्रांतीय आहे. याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात खोद काम केलेल्या गिट्टी खदाणी असून खदाणीचे स्वरूप मोठमोठ्या तलावात झाल्यासारखे आहे. या खदाणीत ५० ते ६० खोलवर असून यात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचून असतात दरवर्षी या साचलेल्या पाण्यात कधी जनावरे तर कधी इसमांचे प्रेत आढळून येत असतात. आज सकाळी अनोळखी महिलेचे प्रेत आढळल्याने शिरपूर पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे.
