जंगली डुकराच्या धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी,पिंप्री येथील घटनेची पुनरावृत्ती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा गावाजवळ डुकराने दुचाकी ला जबर धडक दिल्याने एक इसम जागीच ठार तर एक इसम गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे दि.७ मार्च रोजी दुपारी १:३० च्या दरम्यान गनेश रामराव ठाकरे वय २९ वर्षं रा. पिंपळगाव व दामोधर आजारांवर महाजन वय ४५ वर्षं रा. पिंपळगाव हे दोघेही वडकी वरून आपल्या दुचाकीने दुचाकी क्रमांक MH-29 -B-9526 या गाडीने पिंपळगाव येथे जाण्यासाठी निघाले असता त्यांना रिधोरा येथील बेघर वस्ती समोर डुकराने जबर धडक दिल्याने गणेश रामराव ठाकरे वय 29 वर्ष हा जागीच ठार झाला तर दामोदर अजाबराव महाजन वय 45 वर्ष हा गंभीर जखमी झाला असून त्यांना यवतमाळ येथे संजीवनी हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे.सदर या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार रमेश मेश्राम व कीरण दासरवार, संदिप मडावी यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला आहे. सदर वडकी पोलीस यांनी या घटनेची माहिती मारेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांना देण्यात आली होती या घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षत्र अधिकारी शंकर हटकर व वनपाल आंबेकर टोंगे यांनी रिधोरा येथे बेघर वस्तीजवळ येऊन घटनास्थळे पंचनामा केला असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव हे करीत आहे