तीन विवाहित मैत्रिणी एकाच वेळी पोलीस विभागात दाखल ,होत आहे सर्वांचे कौतुक


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )


पोलीस भरतीचे निकाल लागले आणि अनेकांची स्वप्र पुर्ण झाली जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अनेकांनी यश मिळवले सोमेश्वर गावातील तीन विवाहित महिलांनीही पोलीस भरतीत यश मिळवलं आहे आणि त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे पहाटे तीनला उठायचे. स्वयंपाक करून पाच किलोमीटर सायकल वरून ग्राउंडला पोहचायचे दोन तास मनापासून ग्राऊंडवर सराव करायचा आणि पुन्हा घरी परत याचे नंतर धुनिभांडी करायचेपोरीं शाळेत गेल्या की पुन्हा पाच किलोमीटर वरच्या अभ्यासिकेत जायचे. सायंकाळी देखील ग्राउंड करून मगच घर गाठायचे… अपार कष्ट सरावातील सातत्य कायम ठरेल आणि मेरिटमध्ये येत सोमेश्ववर गावातील मीनाक्षी क्रचे, आरोही शिळीमकर, दीपाली राणे, या तीन विवाहित तरुणी पोलीस दलात भरती झाल्या आहेत मनात. इच्छा शक्ती आणि ठाम निर्धार असेल तर अ्नेक अडचणीवर मात करत राहीले तर यशाचे शिखर गाठता येते सोमेश्वर येथील तीन विवाहित तरुणी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे