विहिरगांव येथे कबड्डी सामन्यांचे माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके सर यांच्या हस्ते उदघाटन

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येथे जहाल मित्र क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य कबड्डी चे खुले सामन्यांचे उदघाटन दि 25/02/2024 रोजी प्रमुख पाहुणे माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके सर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुश मुनेश्वर,प्रकाश पोपट,विलास भुजाडे,विजू कुटे,योगेश देवतले,उपसरपंच अरूण खंगारे, वसंता कुळसंगे,महेश परचाके,प्रतिभा खंगारे ग्रा.पं.सदस्या,वैशाली खंगारे ग्रा.पं.सदस्या, विनोद लुंगसे पो.पाटील, झित्रुजी कोडापे, रघुनाथ खंगारे, चंद्रभान मेटकर,अनिरुद्ध झाडे,निलेश भाऊ राऊत,हनुमानजी खंगारे आदी मान्यवरांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. प्रास्ताविक ग्रा.पं.सदस्य कपिल वगरहांडे व आभार प्रदर्शन अरविंद कोडापे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी सुरेश खंगारे, उदेभान खंगारे, गणेश खंगारे, गणेश रामपूरे,रामाजी खंगारे, बाळकृष्णा खंगारे, सतिश खंगारे, महादेव खंगारे, प्रफुल्ल मेटकर, रामचंद्र रामपूरे,निलेश मेटकर व गावकरी बंधू तसेच मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत..