
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिवाळी या सणाच्या निमित्ताने साई वृद्धाश्रम व बाळू धुमाळ मित्र परिवार यांच्या वतीने राळेगाव नगरपंचायत येथील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शहराच्या स्वच्छतेसाठी वर्षभर परिश्रम घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने प्रत्येक सफाई कर्मचारी बहिणींना साडीचोळी मिठाई, कर्मचारी बांधवांना कपडे व मिठाई दिवाळी निमित्त वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रवींद्र शेराम, महेश शेंडे, फिरोज लाखानी, निलय घिनमीने, सागर वनस्कर, शुभम तोटे, मंगेश राऊत, पराग मानकर, योगेश मलोंडे, लोभेश राऊत, महेश राऊत, अनुष्का धुमाळ, साई धुमाळ, महेश राऊत व हरिभाऊ किन्हेकर यांची उपस्थिती लाभली. तसेच नगरपंचायतचे कर्मचारी वर्ग व सफाई कर्मचारी उत्साहाने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करत, शहर स्वच्छतेसाठी त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे नमूद केले. समाजात सेवा भाव जोपासणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हे कौतुक म्हणजे त्यांच्या श्रमाला दिलेला सन्मान असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. शेवटी सर्व उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दिवाळी सणाचे स्वागत करण्यात आले.साई वृद्धाश्रम व बाळू धुमाळ मित्र परिवार तर्फे सफाई कर्मचाऱ्यांना दिलेल्या साडीचोळी, कपडे आणि मिठाईच्या वाटपामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि “दिवाळीचा खरा आनंद म्हणजे समाजातील मेहनती व्यक्तींना सन्मान देणे” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
