राज्यस्तरीय टेनिस व्हालिबॉल मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ची गगनभरारी ,विजेता संघ 14 वर्ष वयोगटातील मुलांचा टेनिस व्हाली्बॉल संघ राज्यस्तरीय स्पर्धेत दुसऱ्या स्थानी

अमरावती विभागा चे नेतृत्व करीत राज्यस्तरीय 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या टेनिस व्हाली्बॉल मैदानी स्पर्धा चाकूर जि.लातूर येथे दिनांक 26 व 27 मे रोजी पार पडली.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मैदानी स्पर्धेत आपला दबदबा असणारे राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 14 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ झालेल्या अंतिम स्पर्धेत उपविजेता ठरला या संघात मध्ये
खेळाडू म्हणून निसर्ग ताकसांडे, वेदांत बोदडे, मंथन ठाकरे, सुजल कांबळे, नैतिक चौधरी, संविधान हिवरकर
या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर दुसरा क्रमांक मिळवून राळेगाव तालुक्याचे नाव उज्वल केले तर वयोगट 14 वर्ष या गटात खेडाळू चे प्रशिक्षक म्हणून किशोर उईके, आनंद घुगे, रवींद्र खडसे, नरेश दुर्गे, गणेश काळे, कु मयुरी चौधरी यांनी कार्य केले .विजेत्यांचे अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव चे अध्यक्ष बी. के. धर्मे,सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, व शाळेचे मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, पर्यवेक्षक सुरेश कोवे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे…..