श्री लखाजी महाराज विद्यालयात विज्ञान शिक्षिका स्वाती नैताम यांना दिला सेवानिवृत्तीचा निरोप

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका सौ.स्वाती दिलीपराव नैताम दिनांक 12/12/2006 रोजी विज्ञान विषयासाठी रूजू झाल्या होत्या.त्या वयोमानानुसार दिनांक 31/1/2023 रोज मंगळवारी सोळा वर्षे एक महीना एकोणीस दिवसाची नोकरी करून आमच्या मधून म्हणजेच सेवेतून निवृत्त झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांच्या हस्ते सौ.स्वाती नैताम व त्यांचे पती दिलीप नैताम यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.त्यावेळी संस्थेतील सर्व शिक्षकांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्यावेळी या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष आशिष कोल्हे, सचिव रोशन कोल्हे, संचालक शेखर झाडे,सुरेश गंधेवार, दिलीप देशपांडे यांचेसह विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड, रमेश टेंभेकर,श्रावनसिंग वडते,दिगांबर बातुलवार, रंजय चौधरी,मोहन आत्राम,राजेश भोयर,मोहन बोरकर,विशाल मस्के, सौ.कुंदा काळे, शुभम मेश्राम,पवन गिरी, बाबुलाल येसंबरे तसेच वर्ग 9वा ब च्या काही विद्यार्थींनी उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली सातारकर यांनी केले तर आभार सौ.वंदना वाढोणकर यांनी मानले.या कार्यक्रमाला स्वाती नैताम, दिलीप नैताम यांचेसह त्यांची कन्या कु.रानी सुद्धा उपस्थित होते.