
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील संस्कृती संवर्धन महिला संस्था, यवतमाळ द्वारा संचालित संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगावच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी येसेकर या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर याच शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. दिनकरराव उघडे यांची सर्वानुमते मुख्याध्यापकपदी निवड करण्यात आली. शिस्तप्रियता, वक्तशिरपणा, तंत्रज्ञानाची आवड,शैक्षणिक घडामोडीची माहिती याकरिता श्री. दिनकरराव उघडे तालुक्यात प्रसिद्ध आहेत.
मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्याध्यापक श्री. दिनकरराव उघडे यांचे संस्थेचे संचालक मान. दिपकभाऊ एंबडवार, संचालक मंडळ, विविध शिक्षक संघटना, माजी मुख्याध्यापिका मिनाक्षी येसेकर, ज्येष्ठ शिक्षिका सीमा देशमुख, देवेंद्र मून, राकेश नक्षिणे, योगेश मिटकर, सलमा कुरेशी, ज्ञानेश्वरी आत्राम, भाग्यश्री काळे, विलास ठाकरे,अनंता परचाके, प्रकाश अंबादे, तालुक्यातील शिक्षक मित्रपरिवार, पालकांसह सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
