
पवनार – सेवाग्राम राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आय या महामार्गावरील शुक्रवार दि. 21 जुलै 2023 रोजी दिवस भर झालेल्या पाऊसा च्या पाण्यामुळे नागझरी नामक पवनार गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नाल्यावरील महामार्गा वरील नविन पुलाच्या बांधकामा करिता वाहतुकीचा साठी 4 फूट व्यासाच्या एकेरी सिमेंट पाईप वर माती मुरूम टाकून तयार करण्यात आलेला वळण रस्ता पुर्ण पणें खचला असून काल रात्री पासून वाहतुकी करिता पूणपणे बंद करण्यात आला असून पवनार वरून सेवाग्राम कडे जाणारी वाहतूक वर्धा मार्गे वळविण्यात आलेली आहे.तसेच सेवाग्राम कडून पवनार कडे येणारी वाहतूक वर्धा मार्गे वळविण्यात आली आहेत. सदर मार्गाने कोणी हि आज प्रवास करू नये.
सदर रोडचे बांधकाम राजुरेशवर इन्फ्रास्टकच्रर प्रा. लिमिटेड संभाजी नगर (औरंगाबाद) करीत असून याच रोड वरील सर्व पुलांचे बांधकाम श्री. केदारेश्वर इन्फ्रास्टकाचर प्रा.लिमिटेड, पुणे करीत आहे.
