जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करा


प्रतिनिधी : प्रवीण जोशी
ढाणकी.


जातीय तेढ निर्माण होईल असे, कृत्य करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा. अशा मागणीचे निवेदन घेऊन. चर्मकार समाज बांधव दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी पोलीस चौकीवर मोर्चा घेऊन पोलीस चौकीवर धडकले. चर्मकार विकास संघ प्रदेश अध्यक्ष संजय खामकर अहमदनगर, लक्ष्मणराव घुमरे बुलढाणा, वसंतराव धाडवे वासिम, व मीनाक्षी सावळकर यांच्या नेतृत्वात ढाणकीतील महिला व पुरुषासह हजारो समाज आरोपीला अटक करा अशी कशी होत नाही झालीच पाहिजे, गुरु रविदास महाराजांचा विजय असो असे नारे देत पोलीस चौकी ढाणकी येथे. तब्बल दोन तास  मागणी लावून धरली. 16 जानेवारीच्या मध्ये रात्री एका अज्ञात इसमाने प्रभाग क्रमांक तीन मधील एक थोर संताच्या फलकाला चपला चा हार टाकून विटंबना केली होती. या घटनेला पाच दिवस उलटून सुद्धा पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे समाज बांधवांमध्ये असंतोष पसरला. त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटले. समाजाच्या धार्मिक भावना दुखवू नाही आमच्या भावनांची कदर पोलीस प्रशासन करत नसल्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे. असे मोर्चा करांनी पोलीस प्रशासनाला. सांगितले. पोलीस स्टेशन बिटरगाव चे ठाणेदार प्रताप बोस यांनी प्रसंगा अवधान राखत. आरोपीला सात दिवसात अटक करू असे आश्वासन दिले. बातमी लिहीपर्यंत चौकी समोर ठिय्या मांडून बसले होते.