
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
माहिती अधिकार नियम दिनानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी इंदिरा गांधी कला महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य व माहिती अधिकार कक्षाचे अपिलीय अधिकारी डॉ. संतोष आगरकर यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ नियमाचे महत्त्व , त्यातील तरतुदी, माहिती मागवितांना घ्यावयाची काळजी व प्रक्रिया इत्यादी विषयासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी लोकांमध्ये माहिती अधिकाराविषयी जनजागृती करण्यासाठी आवाहन केले. आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक, श्री. विवेक समर्थ यांनी महाविद्यालयात अस्तित्वात असलेल्या माहिती अधिकार कक्षाची कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
