राळेगाव पंचायत समितीच्या इमारतीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा (स्वच्छता गृह आहे मात्र त्या स्वच्छता गृहाच्या दारावर अधिकारी कर्मचारी असे असल्याने हे स्वच्छता गृह अधीकारी कर्मचारी यांच्या करीताच का ? )

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव शहरात २०१४ वर्षी कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या इमारतीत स्वच्छता गृह आहे मात्र या स्वच्छता गृहाच्या दारावरती अधिकारी कर्मचारी असे असल्याने हे स्वच्छतागृह अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी की सर्वसामान्य नागरिकांसाठी असा प्रश्न येथे येणाऱ्या नागरिकांनी केला आहे.
पंचायत समितीच्या इमारतीत सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने पंचायत समिती मध्ये शासकीय कामासाठी ये-जा करणाऱ्या महिला पुरुषांना शौचालय करिता आडोसा शोधावा लागतोय त्यामुळे पंचायत समितीच्या आवारात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात यावे अशी मागणी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरात असलेली जुनी पंचायत समितीची इमारत ही जीर्ण झाली होती त्यामुळे जीर्ण इमारत पाडून नवीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली त्या इमारतीत २०१४ पासून या प्रशासकीय कामकाजही सुरु आहे परंतु या करोडच्या बांधलेल्या इमारतीच्या आत मध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले मात्र शासकीय कामकाजाकरिता तालुक्यातून येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी पंचायत समितीत इमारतीत सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्यक होते मात्र या इमारतीत स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासन स्वच्छता मोहीमवर मोठ्या प्रमाणावर भर देत आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रत्येक शासकीय निमशासकीय आणि सार्वजनिक ठिकाणी शौचालय निर्मितीवर भर देण्यात येत आहे आता तर गावागावात आणि स्थलांतरित व्यक्ती साठी शासन सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देणार आहे तसे आदेश निर्गमित झाल्याची माहिती आहे मात्र पंचायत समितीत शेकडो पुरुष महिला पंचायत समितीत दररोज आपल्या कामासाठी येत असतात मात्र त्यांना शौचालयाला लागल्यास पंचायत समितीच्या इमारतीत स्वच्छतागृह नसल्याने त्यांना पंचायत समितीच्या आवारातच आडोसा शोधावा लगत असल्याने येणाऱ्या महिला पुरुषांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात ७१ ग्रामपंचायती असून १११ गावे आहेत या १११ गावा गावांमधून दररोज कार्यालयात शेकडो लोकांची वर्दळ असते मात्र सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने खेड्यापाड्यातून येणाऱ्या महिला पुरुषांची गैरसोय होत असून पंचायत समिती कार्यलय परिसरात स्वच्छतागृह त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येणाऱ्यांकडून होत आहे.