

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
आज दिनांक 30 जून 2023 शाळेच्या पहिल्या दिवशी महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय निंगणूर ता उमरखेड जि. यवतमाळ येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र कवाने सर व पत्रकार श्री विलास राठोड सर यांच्या हस्ते वर्ग 5 ते 8 च्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले .या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री सुभाष कहुळकर सर , श्री पंडित जाधव सर , श्री विठ्ठल ढाकरे सर , श्री शिवहार दुधेवार सर , श्री उत्तम तास्के सर , श्री राम मिराशे सर , सुमन ढोरे मॅडम , वृषाली बेद्रे मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी श्री बापूराव पेंदे , श्री पंजाबराव देशमुख , रुख्मिना तास्के , प्रेम खूपसे , कांबळे उपस्थित होते .
