
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महावीर युवक मंडळ, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित महावीर प्रीमियर लीग – सीझन 6 च्या निमित्ताने खेळाडूंच्या ऑक्शनचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महावीरजी भंसाली यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमत समूहाचे किशोरजी दर्डा उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कौन्सिल बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजयजी सिसोदिया, जैन मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष सुभाषजी जैन, शाम भंसाली, तसेच गुजराती समाजाचे चेतनजी पारेख यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.या वेळी सहा संघांचे मालक व तब्बल 110 जैन बांधव खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवून, समाजातील एकता व बंधुतेचे दर्शन घडविले. खेळाडूंचे ऑक्शन अत्यंत पारदर्शक आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडले.
प्रमुख अतिथी किशोरजी दर्डा व अध्यक्ष महावीरजी भंसाली यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या संघटनाचे महत्त्व अधोरेखित केले व महावीर युवक मंडळाच्या या उपक्रमाचे मन:पूर्वक अभिनंदन केले. समाजातील तरुणाईला एकत्र आणण्याचा व सकारात्मक ऊर्जेचा संदेश देणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रसंगी विजयजी बुंदेला, सुभाषजी कोटेचा, राजेश तातेड, संजयजी गुगलिया, मोहनजी गांधी, राजू बोरा, मनीष गांधी, प्रमोद छाजेड, अशोक कोठारी, डॉ. रूपेश कोटेचा आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशस्वी आयोजनासाठी महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष समर्पणजी गांधी तसेच दीपक बोरा, आशिष देसाई, अंशुल तातेड, पीयूष तातेड, यश भरुट, यश दोषी, कुणाल पोकर्णा, अक्षय लोढा, मोहित सुराणा, रिंकुश, गौरव सिंगी, अजय लोढा आदींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभावी पद्धतीने तिलकराज गुगलिया यांनी केले.या भव्य ऑक्शन सोहळ्याने समाजातील एकात्मता, उत्साह व क्रीडासंवर्धनाचा सुंदर संदेश दिला.
