कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे स्मशानभूमीत सौरऊर्जा द्वारे पाणी व्यवस्था

सहसंपादक: रामभाऊ भोयर


कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे स्मशानभूमीत अनेक फुलझाडे व पर्यावरण पूरक व्रृक्षांची लागवड करण्यात आली.त्यांना पाणी देणे तसेच अंत्यसंस्कार चे वेळी लागणार्-या पाण्यासाठी सौरपंप ,पाण्याची उंच टाकी बसविण्यात आली.वृक्षसंगोपन/सिंचनासाठी लवकरच ठिबक सिंचन संच बसविण्यात येत आहे.
याकरिता सरपंच सुधीर जवादे पाटील उपसरपंच रमेश तलांडे सचिव राजु निवल, सदस्य संतोष निकुरे, सीमाताई उईके, प्रतिभाताई मोहर्ले,मालाताई लोणबले, सुषमाताई जवादे, कर्मचारी पुंडलीक लोणबले मारुती विठाळे, रोजगार सेवक धनराज तोडसाम, डाटा ऑपरेटर भाग्यश्री खैरकार यांचे सहकार्य लाभले, नागरिकांनी समाधान व्यक्त केले