
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राजीव गांधी क्रीडा संकुल येथे राळेगाव येथे दि.१ ते ३ जाने दरम्यान आ.प्रा.डॉ.अशोकजी उईके राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेत नागपूरच्या युवा नवरंग क्रीडा मंडळाने गोंदियाच्या गोंडवाना क्रीडा मंडळाला २ गुणांनी मात देत आकर्षक आमदार चषक व रोख ₹.७१,०००/- चे निसटते प्रथम बक्षीस मिळविले.
ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव व हौशी कबड्डी मंडळ यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय आमदार चषक स्पर्धेत चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला, वाशीम, बुलढाणा, गोंदिया, भंडारा सह एकूण २९ संघांनी सहभाग घेतला. यानिमित्ताने राळेगाव विधान सभा क्षेत्रातील ८ संघाना राज्यस्तरावरील खेळाडूंशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली. सुभाष क्रीडा मंडळ यवतमाळ व सुवर्णयुग क्रीडा मंडळ यवतमाळ यांना अनुक्रमे तिसरे व चौथे पारितोषिक मिळाले. गोंडवाना क्रीडा मंडळाच्या पूर्वीक मडावी ला बेस्ट डिफेंडर तर सुवर्णयुग क्रीडा मंडळाच्या यशवंत मोहरकर ला बेस्ट रेडर चे पारितोषिके प्राप्त झालीत.
रबरमॅटवर दिवसरात्र झालेल्या या स्पर्धेत सर्व संघांनी आपले उत्कृष्ट असे कबड्डीचे कौशल्य मैदानावर सादर केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजपा तालुकाध्यक्ष मा. चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेत माजी आदिवासी मंत्री तथा आमदार डॉ. अशोकजी उईके सर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी खेळ व राजकारण यांची गुंतागुंत न करण्याचे आवाहन केले व हजारोच्या संख्येने उपस्थित असलेला प्रेक्षक हा याची प्रचिती देतो असे कोपरखेळी केली व सर्व विजयी संघांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. यावेळी ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ च्या अध्यक्षा डॉ. शीतल कोकुलवार, उपविभागीय श्री.सुधीर पाटील, तहसीलदार श्री. अमित भोईटे , ठाणेदार श्री. रामकृष्ण जाधव,गट विकास अधिकारी श्री. केशव पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय पांडे, भाजपा शहर प्रमुख डॉ.कुणाल भोयर, सुवर्णयुग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री.अभय राऊत,माजी नगराध्यक्ष श्री. बबन भोंगरे, श्री. लालाजी राऊत,श्री. किशोर जुनूनकर, श्री. नंदूजी वानखेडे, श्री संजय देठे, शिवसेना शहर संघटक श्री.संदीप पेंदोर, चांदखा कुरेशी, श्री.शुभम मुके, श्री.प्रफुल कोल्हे, श्री.सुधाकर गेडाम यादी उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे संचालन सर्वोदय अकॅडमी चे संचालक श्री.निखिल राऊत यांनी केले तर स्पर्धेचे आयोजक ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी साईनाथ बल्लेवार, विकास शेळके, कुलदीप वाघमारे, सतीश काकडे, आशिष कडू, अरविंद बटाले,मनोज भगत, ईश्वर पेंद्राम, योगेश कुटे, रोशन भोयर,हिवरकर, गडे आदि शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांना मेहनत घेतली.
