
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो.7875525877
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी मोरचंडी येथील एका युवकांनी दहशत निर्माण करणाऱ्या मनोरुग्णाला पकडण्यासाठी गेले असता बिटरगाव पोलिसांनी जीवाची बाजी लावली त्या मनोरुनाला पकडताना त्याच्या दहशतीत असलेल्या गावाकऱ्यांनी कोणतीही सहकार्य न केल्याने आश्वर्य व्यक्त केले जात आहे मोरचंडी गावातील विजय राठोड हा हातात काठी व गज घेऊन दहशत पसरत असल्याची माहिती पोलीस पाटलानी माहिती बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमकुमार केदार साहेबाना माहिती दिल्या बरोबर ठाणेदार प्रेमकुमार केदार साहेबांनी ताबडतोब बिट जमादार दत्ता कवटेकर व, प्रवीण चव्हाण यांना मोरचंडी गावात पाठविल्यावर हे पोलीस कर्मच्यारी गावात गेल्यानंतर त्याला विजय राठोड हे हनुमान मंदिरात असल्याचे समजले पोलीस कर्मच्यारी त्याला पकडण्यास गेले असता त्याने मंदिरातील घंटा तोडून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला फेकून मारले व त्यात जमादार दत्ता कवडेकर गंभीर जख्मी झाले या बाबींची माहिती मिळताच बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस ठाणेदार प्रेमकुमार केदार साहेब हे पोलीस कर्मचारी हेमंत जाधव प्रकाश मुडे व अंबादास गारोळे यांच्यासह मोरचंडीला आले त्यावेळी लाकडाने राठोड यांनी ठाणेदार प्रेमकुमार केदार साहेबावर प्राणघात हल्ला केला परंतु त्याला शिताफिने ठाणेदारांनी त्याला ताब्यात घेतले त्यानंतर त्याना हातपाय बांधून त्याला शांत करीत नातेवाईकांच्या स्वाधीन केले व पुडील उपचारासाठी त्याला नांदेड ला रवाना करण्यात आले
