विविध मागण्यांसाठी भोई समाजांचे तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन

प्रतिनिधी: रामभाऊ भोयर

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सरसकट मंजूर करा, झाडगावातील पुनर्वसन करा

महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व युगांतर फाउंडेशन यवतमाळच्या वतीने दिं १४ फेब्रुवारी २०२४ रोज बुधवार ला तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या संदर्भात एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
राळेगाव तालुक्यातील भोई समाजाला यशवंतराव घरकुल योजनेअंतर्गत घरकुल सरसकट मंजूर करावे तसेच मोदी आवास योजनेमध्ये राखीव उद्दिष्ट असावे घरकुल योजने करिता देण्यात येणारा दिड लाख रुपयाचा निधी ही महागाईचे दर पाहता हिशोबाने कमी असून दिड लाखा ऐवजी अडीच लाख वाढून देण्यात यावी तसेच मौजा झाडगाव येथील पुरग्रस्त भोई समाजाच्या वस्तीचे पुनर्वसन करावे राळेगाव तालुक्यातील भोई समाज नदी, नाल्याच्या काठावर राहत असल्यामुळे नदी, नाल्याच्या पुरामुळे धोका पत्करून जीवित व प्राणहानी सारख्या आपत्तीचा सामना करीत आहे. पडक्या, कच्च्या घरात राहत आहे त्यामुळे भटक्या, विमुक्त जाती करिता असलेल्या यशवंत चव्हाण घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास या योजनेचा लाभ समाजाला देण्यात यावा तालुक्यातील झाडगाव येथील प्रस्तावित गट नंबर १७४ मध्ये ग्रामसभेचा ठराव होऊनही पुनर्वसनाच्या कोणत्याही कामाची सुरुवात करण्यात आलेली नाही. सन २०२२ च्या अतिवृष्टी मध्ये झाडगाव येथील १७४ मध्ये भोई समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरले होते व मोठे आर्थिक नुकसान झाले होते त्यावेळी तत्कालीन मंत्री महोदयांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही १७४ पुनर्वसनाची कोणती प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न त्वरित मार्गी लावून भविष्यातील धोका टाळण्याकरिता भोई समाजाला या ठिकाणी त्वरित पुनर्वसन करून आवश्यक सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्या अशा विविध मागणीचे लेखी निवेदन भोई समाजाच्या वतीने प्रशासनाकडे केले आहे.यावेळी भोई समाजाचे महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मारोतराव पडाळ कार्याध्यक्ष राहुल पडाळ महादेव वाघाडे परसराम करलुके, हनुमान सातघरे, राजू मने ,शरद परिसे, गोपाल पारिसे ,रामदास कोल्हे, सुरेश दाते, अनंता पारिसे, गीता पडाळ, दुर्गादास कपाटे, प्रमोद पोहनकर, चिंतामण बावणे, अनंता पारिसे आदी भोई समाज हजर होते यावेळी राळेगावचे तहसीलदार अमित भोईटे यांनी धरणे आंदोलन स्थळी भेट देऊन धरणेग्रस्तां कडून माहिती जाणून घेतली व आपल्या स्तरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.