इच्छुक उमेदवारांच्या फ्लेक्स्ने शहर फ्लेक्समय

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ठिकठिकाणी प्लेस लावले आहेत ज्यामुळे राळेगाव शहर हे फ्लेक्स मय झाल्याचे दिसते विधानसभा निवडणूक ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहेत या निवडणुकी करता अनेक इच्छुक उमेदवार हे गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत ज्यामध्ये सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी पोलीस निरीक्षक मेजर डॉक्टर तलाठी यांच्यासह इतरही अनेक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत व निरनिराळ्या पक्षाकडून तसे प्रयत्न करत आहेत नुकताच आदिवासी दिन साजरा झाला तसेच स्वातंत्र्य दिन लगेच आहे या दोन्ही दिनाच्या शुभेच्छा म्हणून विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी राळेगाव शहरांमध्ये तसेच मतदारसंघांमध्ये ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले आहेत या फ्लेक्स च्या माध्यमातून ते आपला परिचय राळेगाव शहर तसेच मतदार संघाला करून देऊ पाहत आहे गेल्या पाच वर्षांमध्ये यातील अनेक उमेदवार हे कोठेच नव्हते केवळ निवडणुकीच्या तोंडावर फ्लेक्स लावून आपला परिचय हे मतदारसंघातील लोकांना करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत केवळ फ्लेक्स लावल्याने निवडून येतात असा गोड गैरसमज या इच्छुकांचा झाल्याचे दिसते यांच्या शुभेच्छांच्या फ्लेक्समुळे मात्र शहराचा चेहरा विद्रूप झाला एवढे निश्चित