वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप,सामाजिक उपक्रमाने वाढदिवस केला साजरा.

कारंजा (घा):- कारंजा शहरातील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक माधवराव जसुतकर यांनी त्यांच्या ८२ वा वाढदिवसानिमित्त वसतिगृहातील मुलांना केक भरवून आणि ब्लँकेट वाटप करून वाढदिवस साजरा केला.तसेच त्यांच्या पत्नी कुसुम जसुतकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी व आप्त स्वकियांसाठी स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले होते.माधवराव जसुतकर हे नेहमीच झाडे लावणे, पुस्तके वाटप करने, ब्लँकेट वाटप करणे अश्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्यातून स्वतःचा वाढदिवस साजरा करत असतात. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमूख पाहुण्यांनी तसेच वसतिगृहातील मुलांनी माधवराव जसुतकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विश्वनाथ मस्के,घनश्याम चाफले,उमेश चाफले, राजेश काळबांडे,सुरेश भोयर,प्रधान सर, रुपेश मस्के,निलेश भुयार,नारायण पठाडे,रवींद्र गुजरकर,विजय वैद्य ,प्रदीप उके आणि बराच आप्त परिवार उपस्थित होता.त्यांचा मुलगा राजू जसुतकर व त्यांची स्नुषा माधुरी जसुतकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.हर्षद गुजरकर , वेदांत जसुतकर ,तेजस लांजेवार,सौरभ वैद्य या त्यांच्या नातवंडानी सर्वांचे उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.