
प्रतिनिधी: प्रवीण जोशी
दिनांक ३ फेब्रुवारी शुक्रवारला एका स्थानिक चौकाला प्रजापती श्री विश्वकर्मा असे नामकरन करण्यात आले तत्पूर्वी कला व कौशल्या चे आराध्य दैवत प्रजापती श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तदनंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विधिवत पूजन करून आदरयुक्त नमस्कार अर्पण केला तसे बघता ज्यावेळी कोणतीही कला कौशल्य या बाबीची जडणघडण किंवा जन्मा घालावयाची असल्यास श्री प्रजापती विश्वकर्मा यांचे स्मरण करूनच पुढील कार्य सिद्दीस नेल्या जाते तसेच अनेक पौराणिक कथेमध्ये सुद्धा प्रजापती श्री विश्वकर्मा यांच्या कलेचा उत्कृष्ट व सुबक अशा कलाकृतींचे पितामह म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे या दिलेल्या चौकाला श्री विश्वकर्मा यांचे नाव दिल्यामुळे योग्य तो न्याय या परिसराला मिळाला असे अनेक उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी सांगितले विशेष म्हणजे माता भगिनींनी सूबक व उत्कृष्ट स्थापत्य असलेल्या रांगोळ्या काढून वातावरण अधिकच भक्तिमय व मंगलमय बनवले होते या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते त्यामध्ये शहराचे नगराध्यक्ष सुरेशजी जयस्वाल, उपनगराध्यक्ष शेख जहीर, विष्णुदासजी वर्मा, बाळासाहेब चंद्रे, आनंदराव चंद्रे, रमेश गायकवाड, नितीन ठाकूर, शिवाजी वैद्य, व गेल्या अनेक वर्षांपासून प्रजापती श्री विश्वकर्मा यांना आराध्य मानून आपल्या कला व कौशल्याने अख्या पंचकोशीत प्रसिद्ध असलेले गंगाराम सूर्यवंशी सुद्धा उपस्थित होते व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
