
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार यांचा राळेगाव तालुक्यात दिनांक 21/10/2023 रोज शनिवारला शासकीय दौरा हा नियोजित असून या दौऱ्यात त्या राळेगाव तालुक्यातील खालील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार असून सकाळी ठीक 10.30 वाजता राळेगाव शहरात आगमन होणार असून 11.30 वाजता काराई गोराई देवीचे दर्शन घेणार आहे.त्यानंतर 12.30 वाजता वाढोणाबाजार येथील ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेतली जाणार आहे. दुपारी 1.00 वाजता लाडकी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घघाटन करणार आहे.त्यानंतर 1.30 वाजता येवती येथील रोडचे भुमीपूजन करणार असून 2.00 वाजता जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे भुमीपूजन करणार असून 2.30वाजता वनोजा येथे विकासकामे मंजूर केल्याबद्दल वनोजा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.त्यानंतर 3.00 वाजता अंतरगाव येथील रोडचे भुमीपूजन त्यानंतर 4.00 वाजता मेंगापूर येथील रोडचे भुमीपूजन त्यानंतर ठीक 5.00 वाजता राळेगाव तालुका सरपंच संघटनेच्या आढावा बैठक होणार असून ठीक 6.00 वाजता मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी संपर्क साधण्यासाठी जिल्हा प्रमुख उमाकांत पापिनवार,उपजिल्हा प्रमुख सचिन महल्ले, युवासेना जिल्हा प्रमुख आकाश कुटेमाटे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा प्रमुख शब्बीर खान, दिशा समिती सदस्य सुरेश कन्नाके, सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य सदस्य किशोर धामंदे , शिवसेना तालुकाप्रमुख मनोज भोयर,शहर प्रमुख संतोष कोकुलवार, अमित पिसे, रमेश कन्नाके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून सायंकाळी 7.00 वाजता माननीय खासदार यांचे यवतमाळकडे परतीचा प्रवास सुरू होणार असून या नियोजित दौऱ्याची माहिती तहसीलदार राळेगाव, गटविकास अधिकारी राळेगाव, तालुका कृषी अधिकारी राळेगाव, मुख्याधिकारी राळेगाव,शहर पोलिस स्टेशन राळेगाव, समस्त शिवसेनेचे कार्यकर्ते व समस्त पत्रकार बांधवांना दिली असून अशा प्रकारे यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयातील मिळालेल्या पत्रातून माहिती दिली असल्याचे सांगितले आहे.
