
सहसंपादक : रामभाऊ भोयर
केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीत एक मोठा बदल केला असून १२ टक्के व २८ टक्के करस्लॅब रद्द करून आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच दर ठेवले आहेत हे दर २२ सप्टेंबर पासून लागू झाले असून ग्राहकांना मात्र जुन्या जीएसटीच्या दरानेच माल खरेदी करावा लागत असल्याची ओरड ग्राहकाकडून केली जात असून केंद्र शासनाची घोषणा ही सध्या तरी केवळ कागदावरच राहिली आहे.
ग्राहक दुकानात माल घेत असताना जीएसटी च्या नवीन दराप्रमाणे दिल्या जात आहे का अशी विचारणा केली असता दुकानदारांकडून असे सांगितले जात आहे की आमच्याकडे जुना माल आहे आणि जोपर्यंत तो संपत नाही, तोपर्यंत नवीन दर लागू करता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण दुकानदार देत आहेत. त्यामुळे, जीएसटी कपातीचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. मग दुकानदाराकडील अद्यापही जुना माल संपलेला नाही का याची तपासणी कोण करणार जर माल संपलेला असेल तर ग्राहकांची फसवणूक तर केली जात नाही ना असा प्रश्न सध्या ग्राहक करताना दिसत आहे तेव्हा संबंधित विभागाने दुकानातील चौकशी करावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे .
