के .बी एच. विद्यालय पवननगर नवीन नाशिक येथे राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के बी. एच. विद्यालय पवन नगर येथे आज दिनांक 26/06/2023 सोमवार रोजी राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . उमेश देवरे सर होते. त्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.यानंतर ज्येष्ठ शिक्षक हिरे प्रदीप यांनी शाहू महाराज यांच्या विषयी माहिती सांगितली.तसेचअध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री उमेश देवरे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक,समाजातील विविध घटकांसाठी केलेल्या कार्याबाबत माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय पवार यांनी केले. कविता सोनवणे यांनी आभार मानले..यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.