
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड येथे एअरटेल कंपनीने अचानकच गावातील संत रघुनाथ स्वामी महाराज मंदिर परिसरात टावर उभे करण्यासाठी दोन दिवसांपासून काम सुरू केले असून हे काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी आजूबाजूला शाळा, सभोवताली राहती घरे असून या टावरमुळे भविष्यात अनेक भयानक आजार,गरोदर महिलांना, लहान मुलांना, वयोवृद्ध व्यक्तींना आजारांना सामोरे जावे लागणार असल्याने गावातील लोकांनी हे टावर गावाव्यतिरिक्त गावा सभोवताली असलेल्या देवस्थानच्या शेतीत घेतले तर गावाला होत असलेल्या दुष्परिणामातून सावरता येईल आणि देवस्थानच्या गावातील जमिनीच्या व्यतिरिक्त गावाला लागूनच असलेल्या शेतात काम सुरू केले तर देवस्थानच्या मनात गावातील लोकांबद्दल असलेली सहानुभूती पूर्ण होईल.विषेश म्हणजे या अचानक काम सुरू केल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिक व सभोवतालच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी ग्राम पंचायत कार्यालयात धाव घेऊन गाव आणि ग्रामपंचायत मधला दुवा असलेल्या सचिव कांबळे यांना विचारणा केली असता आम्ही असे कोणत्याही प्रकारचे काम सुरू करण्याबद्दल नाहरकत प्रमाणपत्र दिले नसून तसल्या प्रकारचे लेखी पत्र सुद्धा सचिवांनी गावकऱ्यांना दिले आहे .जर ग्राम पंचायतचे पत्र न देता टावर कंपनीने आपले काम एकाएकी सुरू करणे म्हणजे त्या कंपनीच्या संबंधितांना कुठल्या तरी गाव पुढाऱ्यांनी तोंडी आश्वासन देऊन गावातील लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार तर नसावा. या एकाएकी केलेल्या धाडसाने, दाल मे कुछ काला है किंवा पाणी कुठे तरी मुरत असावं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नसून करीता या आरोग्याला धोकादायक असलेल्या टावरचे काम बंद करून आजूबाजूला शेतात करण्यात यावे अशा प्रकारचे गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना भेटून दिनांक 28/3/2025 रोजी दिले असून उपविभागीय अधिकारी राळेगाव यांनी याबद्दल सविस्तर चौकशी करणार असल्याचे सांगितले असून त्याबद्दल ताबडतोब कारवाई न झाल्यास परत एकदा निवेदन सादर करून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे अरविंद निमट उत्तम भोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
