
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
श्री संत शंकर महाराज कृषी विद्यालय पिंपळखुटा येथिल अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असणारी विद्यार्थिनी कुं सोनल प्रकाशराव घिनमीने हिने कृषी कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत प्रशिक्षण घेऊन रावेरी येथे शेतकऱ्यांना गांजर गवत निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले.
दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या शेतात गांजर गवताच्या प्रमाणत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून हे गांजर गवत शेतात झाल्यास दुसरे पीक सुद्धा होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते त्याचप्रमाणे गांजर गवत शरीराला सुद्धा हानिकारक ठरत आहे
त्यामुळे गांजरगवताचे कशा पद्धतीने निर्मूलन करावे याबाबत कुं सोनल हिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले असून शेतकऱ्यांनी मॅक्सिकन थिटल,रासायनिक नियोजन २,४ डी,(५८%) २ ते ५ मि.ली प्रतिलिटर ग्लायफोसेट (४१%) ८ ते १० मी.ली. मारल्यास गांजरगवत आटोक्यात येऊ शकते अशा पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी यु पाटील,डॉ शरद नायक, पवन चिमोटे, यांनीही मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
