
प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव
मागील सात दिवसापासुन जोरदार होत असलेल्या पावसाने तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस या सर्व पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच अनेक समस्याना तोंड देवून दुबार पेरणी करून मेटाकुटीस आलेला शेतकरी आता पुरता हतबल झालेला आहे. त्यामुळे शासनाने ताबडतोब शेतीचे पंचनामे करून मदत द्यावी यासाठी आज तहसील कार्यालय हदगाव येथे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी तालुका प्रमुख शामराव चव्हाण मामा,विधानसभा संघटक अवधूत देवसरकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शिवा भैया चंदेल,शिवसेना शहर प्रमुख राहुल भोळे,दीपक मुधोळकर ,किशोर भोस्कर, पांडू वस्ताद जाधव,परसराम चव्हाण,विठ्ठल पिसाळ इत्यादी सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
