मोर्चामध्ये जनतेने सामील व्हावे. – बळवंतराव मडावी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी, बिरसा ब्रिगेड, व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जनतेच्या वेगवेगळ्या समस्या संदर्भात भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहेत. आदिवासी जमातीमध्ये इतर जमातींना समाविष्ट करू नये.पेसा कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. पेसा शिक्षक भरती घेण्यात यावी. राळेगाव विधान सभेमधले रस्ते दुरुस्त्या करण्यात यावे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यावे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. शेतकऱ्यांना पिकाचा मोबदला देऊन कापूस सोयाबीन, व तुर यांना योग्य तो वाढीव भाव देण्यात यावा. कंत्राटी नोकर भरती पद्धत बंद करण्यात यावी व कायमस्वरूपी नोकर भरती घेण्यात यावी. सर्व जमातीच्या व जातीच्या नोकर भरती अनुशेष भरण्यात यावा. पेसा कायद्याची व वन हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. व पेसामधून सुटलेल्या आदिवासी गावांना पेसा मध्ये समाविष्ट करण्यात यावे. जंगल जमिनीचे पट्टे शेतकऱ्यांना देण्यात यावे. बेरोजगार युवकांना त्वरित रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देण्यात याव्या. बेरोजगार युवकांना प्रति महिना भत्ता १०००० देण्यात यावा. राळेगाव- बाबुळगाव- कळंब या तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांकरीता ग्रंथालय व वाचनालय बांधून देण्यात यावे व क्रीडांगण तिन्ही तालुक्यात तयार करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्याच्या सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात याव्या व डॉक्टरांची, नर्सेस व कर्मचाऱ्यांची पूर्णपणे भरती करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या थकीत असलेल्या स्कॉलरशिप विद्यावेतन तात्काळ देण्यात यावे.विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा शुल्क हे माफ करण्यात यावे व ते घेण्यात येऊ नये. जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांना शेतासाठी तारेचे कुंपण देण्यात यावे. 65000 शाळेचे झालेले खाजगीकरण तात्काळ रद्द करून, बीडमध्ये आदिवासी महिलांची काढलेली भाजप आमदाराच्या पत्नीकडून उघडी धिंड काढणाऱ्यांनवर त्वरित ॲट्रॉसिटी दाखल करून आमदारासहित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.मनिपुर येथे होत असलेल्या आदिवासींवरील अत्याचार तात्काळ बंद करण्यात यावे. येणाऱ्या सार्वत्रिक सर्व निवडणुका EVM मशीन बंद करून बॅलेट पेपर वर घेण्यात यावी. अतिक्रमणधारकांना वन महसूल गायरान जमिनीचे पट्टे त्वरित अतिक्रमण धारकाच्या नावे करण्यात येऊन त्यांच्या नावे सातबारा देण्यात यावा. घरकुलाला सरसकट ग्रामीण व शहरी भागाला ३ लाख रुपये देण्यात यावे. महीला वरील अत्याचार विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. नरसापुर कळंब शिवारातील पारधी समाजाला त्यांचे वन हक्क जमिनीचे पट्टे त्यांच्या नावे तात्काळ करून देण्यात यावे.या सर्व मागणी करिता राळेगाव येथे ३ नोव्हेंबर रोजी शुक्रवारला सकाळी ११ वाजता क्रांतीविर वीर बाबुराव शेडमाके यांच्या तैल चित्रापासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर गोंडवाना गणतंत्र पार्टी, बिरसा ब्रिगेड, व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.
तरी या मोर्चात सर्व जनतेने सामील व्हावे असे आवाहन , गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बळवंतराव मडावी,बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अरविंद कुळमेथे, बिरसा ब्रिगेड संघटक प्राध्यापक वसंत कनाके, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष विकास मून, वंचित बहुजन आघाडी राळेगाव विधानसभा प्रमुख डॉ.ओम फुलमाळी,सुगद नारायणे, गों.ग.पा च्या विजयाताई रोहणकर, जिल्हाध्यक्ष विशाल वाघ, बिरसा ब्रिगेडचे उमेश येरमे ,विनोद ऊईके, जगदीश मडावी ,महादेव मेश्राम ,दिनेश करपते ,विठ्ठल कनाके, कुणाल केराम, नाना कनाके, मनीष गेडाम अविनाश कुळसंगे ,लक्ष्मीबाई टेकाम, पवन टेकाम, प्रमोद ईरपाते, भारती ईरपाते, विद्या परचाके, अमोल मडावी, सुनील मेश्राम, वैभव वेट्टी, एड. शलाका उईके, संगीता उमरे, प्रशांत घोडाम, सुनील धुर्वे, सुधाकर चांदेकर, लीलाधर आरमोरीकर, धनराज मेश्राम, समीर केराम, आदर्श मडावी ,पवन टेकाम आदींनी केले आहे.
